वाट पाहतोय मी तुझी…मित्रा(आकाश)

Rahul
1 Min Read

     वाट पाहतोय मी तुझी…मित्रा (आकाश)

सोडून मला गेलास कुठे
परत आता येशील का..?
वाट पाहतोय मी तुझी…
मिठीत मला घेशील का..??

तुझी आठवण आल्याशिवायएकही दिवस जात नाही..

सांग ना तू गेलास कुठे
परत का येत नाही…??

तू सोडून गेल्यापासून

मेल्यासारखं जगतोय…
झुरून झुरून मन अजून
तुझीच वाट बघतय…

आता जास्त आठवण आली की, फोटो तुझे बघत आहे…
आणि तू येण्याच्या आशेवरती
असाच मरून जगत आहे…..

किती दिवस फोटोत पाहू मित्रा
समोर आता येशील का..?
वाट पाहतोय मी तुझी
मिठीत मित्रा मला घेशील का..??

तुझ्याविणा झालंय रे हे
जगणं सारं व्यर्थ….
प्रेमात तुझ्या नाही मित्रा
माझा कसलाच स्वार्थ….
शिवाय तुझ्या ह्या जगण्याला
उरला नाही अर्थ….

मग,व्यर्थ अश्या ह्या जगण्याला
येऊन अर्थ देशील का…?
वाट पाहतोय मी तुझी मित्रा
मिठीत मला घेशील का…??
मिठीत मला घेशील का…???

———– गौरव गुल्हाने
ता:आष्टी, जि:वधा
(ऱ्पिय मित्र आकाश कोहळे यास कविता भेट

TAGGED:
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *