लहान आर्वी येथे उमेद च्या महीलांनी राबविले स्वच्छता अभियान*  

Rahul
2 Min Read

* मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान अंतर्गत उपक्रम*

*प्रभाग समन्वयक सारीका पेठे यांची प्रमुख उपस्थिती*

*लहान आर्वी :-*

*प्रतिनिधी /सुनिल साबळे*

 

येथुन नजीकच असलेल्या लहान आर्वी येथील चावडी चौकातील लिंगापुर रोड येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये उमेद बचत गटातील महिलांचा उस्फूर्तपणे सहभाग होता. 

आष्टी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नागेश ढोरे आणि पंचायत विस्तार अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उमेद च्या लहान आर्वी प्रभाग समन्यवयक सारीका पेठे, सीआरपी निलीमा देशमुख,वनिता साबळे, लेखापाल पुनम राऊत,कृषी सखी रेखा आकोलकर तसेच बचत गटाच्या महिला सदस्य आणि ग्रामपंचायत सरपंच सुनिल साबळे,उपसरपंच अमोल होले व ग्रामपंचायत सदस्य सागर नागापुरे तसेच ग्रामपंचायत अधिकारी अनुराधा धारपुरे आणि सहाय्यक कृषी अधिकारी चंचल देशमुख ,तिन्ही अंगणवाडी सेविका शोभा देशमुख,कल्पना कुथे,मोनाली गायकी,आशा वर्कर मंगला भिवापुरे,आशा डेहनकर यांनी बचत गटातील आणि भजन मंडळातील महीलांना सोबत घेऊन लिंगापुर रोडवरील गजानन मख यांच्या घरापासुन ते कालव्या पर्यंतच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात असलेला कचरा उचलुन साफसफाई केली. मोहल्यातील लोकं या रोडवर वरचेवर कचरा टाकत असतात. या रोडवर कचऱ्याचे साम्राज्य असल्यामुळे रोड वरून जाणाऱ्या लोकांना खूप त्रास होतो . नागरिकांच्या कचऱ्यामुळे खूप गंदगी पसरली आहे. लहान आर्वी ग्रामपंचायतने मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान अंतर्गत सामाजिक जाणीव म्हणून या रस्त्याची स्वच्छता करून “स्वच्छ गाव आणि सुंदर गाव” या संकल्पनेमध्ये गावाला बसवावं अशी आशा उमेद कॅडरने दर्शविली आहे.त्यामुळे या गोष्टीची दखल घेऊन उमेदच्या सर्व महिलांना या स्वच्छता मोहिमेच्या उपक्रमात सहभागी करून त्यांच्याकडून तो परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी लहान आर्वी ग्रामपंचायतचे सरपंच सुनिल साबळे यांनी बचत गटातील महीलांना आणि भजन मंडळातील महीलांना विनंती केल्या प्रमाणे मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान अंतर्गत उपक्रमात सहभागी होऊन शोभा गाडगे,सरला खेरडे, योगीता घाटोळ,शोभा गाडगे,ज्योती उज्जैनकर,वनिता पाटील,मनिषा गायकी,नंदा विनोद देशमुख,प्रगती लंगडे,उषा राऊत, कविता वाठोकर,शारदा मख,सपना भुस्कडे,बेबी जहकर,रुखमा ठोंबरे,रूबीना शहाॅ,सुनिल गायकी,ग्रामपंचयात कर्मचारी किशोर खंढारे,पंकज राऊत,मनोहर खानजोडे यांनी उपस्थित राहुन स्वच्छता अभियानात सहकार्य केले.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *