महिला भजन मंडळाचा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात उत्स्फूर्त सहभाग

Rahul
2 Min Read

लहान आर्वी येथील श्री संत मारोती महाराज महिला भजन मंडळाचा स्तुत्य उपक्रम

लहान आर्वी :-
प्रतिनिधी/सुनिल साबळे

स्थानिक लहान आर्वी ग्रामपंचायत मध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत विविध सामाजिक व जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत असून या अभियानाला गावातील महिला संघटनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. याच अनुषंगाने लहान आर्वी येथील श्री संत मारोती महाराज महिला भजन मंडळाने अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून एक आदर्श उदाहरण समाजासमोर ठेवले आहे.
ग्रामविकासात सार्वजनिक स्वच्छता, गावातील सामाजिक सलोखा व नैतिक मूल्यांची जोपासना या उद्देशाने श्री संत मारोती महिला भजन मंडळाच्या वतीने “महास्वच्छता अभियानात” महत्त्वाचा सहभाग दिसून येतो आहे.या कार्यक्रमातून ग्रामस्थांमध्ये पंचायत राज व्यवस्थेचे महत्त्व, महिलांची भूमिका, स्वच्छता, व्यसनमुक्ती व सामाजिक एकोपा याबाबत प्रभावी जनजागृती करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून गावांचा सर्वांगीण विकास साधण्याचा शासनाचा उद्देश असून, त्याला श्री संत मारोती महाराज महिला भजन मंडळासारख्या सामाजिक संस्थांचा सहभाग लाभणे ही अत्यंत सकारात्मक बाब मानली जात आहे. महिला भजन मंडळाच्या सदस्यां सौ. सरला खेरडे,सौ.शोभा गाडगे,सौ.आशा होले,सौ मंदा होले,सौ.योगीता घाटोळ,सौ.सावित्री होले,सौ रमा बानाईत ,श्रीमती सुनंदा खेरडे,सौ. कांता साबळे,सौ कमला होले सौ. सुनिता साबळे,सौ.रेखा होले,सौ.रेखा कान्होलकर,सौ.सिमा होले ,सौ.मंगला होले,श्रीमती शालु सावळीकर,सौ.कांता पाटील,सौ.निर्मला पाटील,सौ.सुनंदा होले , सौ. सविता उमप आणि सौ. वनिता साबळे यांनी पारंपरिक भजनांच्या माध्यमातून आधुनिक सामाजिक संदेश देत ग्रामविकासात महिलांचा सहभाग किती महत्त्वाचा आहे हे प्रभावीपणे अधोरेखित केले आहे.
या उपक्रमास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या वेळी मोठ्या संख्येने महिला, ज्येष्ठ नागरिक व युवक उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी महिला भजन मंडळाच्या कार्याचे कौतुक करत अशाच उपक्रमांतून गावाचा सर्वांगीण विकास साधता येईल, असे मत व्यक्त केले.
श्री संत मारोती महाराज महिला भजन मंडळाचा हा उपक्रम केवळ धार्मिक न राहता सामाजिक परिवर्तन घडवणारा ठरला असून, इतर गावांसाठीही तो प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी सरपंच सुनिल साबळे यांनी व्यक्त केले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *