रामटेक :-दिलीप येवले.
रामटेक विधानसभा निवडणुकीतील अनुशासनभंगाच्या कारवाईनंतर काँग्रेसकडून निलंबित करण्यात आलेले चंद्रपाल चौकसे यांनी अखेर काँग्रेसचा ‘हात’ सोडून राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) ‘घड्याळ’ बांधले. पक्षप्रवेश करताच त्यांची थेट प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे.
रामटेक विधानसभेची जागा महाविकास आघाडीच्या वाटपात उद्धव सेनेला दिली होती आणि विशाल बरबटे यांना
उमेदवार केले होते. या निर्णयावर नाराज होऊन काँग्रेस नेते राजेंद्र मुळक व चंद्रपाल चौकसे यांनी बंडखोरीचा मार्ग अवलंबून स्वतंत्र निवडणूक लढविली. दोघेही निवडणुकीत पराभूत झाले. त्यानंतर काँग्रेसने मुळक यांचे निलंबन मागे घेतले; मात्र चौकसेंवरील कारवाई कायम ठेवली. दरम्यान त्यांनी राष्ट्रवादीत (अजित पवार गट) प्रवेश केला. पक्ष निरीक्षक राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ टांकसाळे, शहराध्यक्ष अनिल अहीरकर आणि कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर यांनी त्यांचे स्वागत केले.