आरोग्य उपकेंद्राची खास्ता हालत.. 

Rahul
1 Min Read

 

* सायंकाळी पाच नंतर दवाखाना राहतो कुलुपबंद..

* इमारतीच्या छताची छपाई ही कोसळली…

विरूळ आकाजी.. प्रतिनिधी

आर्वि तालुक्यातील सर्वात मोठे लोकसंख्या असलेले व राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या विरूळ गावात आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा वाजले आहे.मागिल तीस चाळीस वर्षांपासून विरूळ व आजुबाजूच्या गावांची लोकसंख्या लक्षात घेता विरूळ येथे आरोग्य केंद्राची मागणी शासन दरबारी धुळखात पडुन आहे.लोकप्रतिनिधिंच्या दुर्लक्ष पणामुळे येथे आरोग्य केंद्राची निर्मिती होऊ शकली नाही.शासकीय स्तरावर येथे आरोग्य केंद्र मंजुरी बाबत माहिती संबंधित ग्रामपंचायत पण देण्यात आली परंतु येथिल आरोग्य केंद्र राजकीय दबावामुळे दुसऱ्या गावात मंजूर करण्यात आले असे चर्चेत आहे आरोग्य केंद्र तर नाही च नाही परंतु येथे असलेल्या आरोग्य उपकेंद्राची खास्ता हालत आहे..या उपकेंद्रात एक वर्षांपासून डॉक्टर नाही.इमारत आहे परंतु ती इमारत जीर्ण झाली आहे.मागील महीन्यात या इमारतीच्या स्लैब ची छपाई कोसळली.त्यामुळे रात्री येथे कोणीच कर्मचारी राहत नसल्याने या आरोग्य केंद्राला सायंकाळी पाच वाजता कुलुप बंद करावे लागते.त्यामुळे रात्री एखाद्या रूग्ण आजारी पडला तर पुलगाव येथे उपचारासाठी जावे लागते.. आर्वि तालुक्यातील आरोग्य यंत्रणेच्या अधिकारी यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.. मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *