विरुळ आकाजी:-
स्थानिक इंडियन मिलिटरी स्कूल येथील एन सी सी च्या छात्रसैनिकांनी सेवाग्राम येथे झालेल्या ॲन्यूअल ट्रेनिंग कॅम्प मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आपले व विद्यालयाचे नाव उंचाविले..
दिनांक 11 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर दरम्यान 21 महाराष्ट्र बटालियन मार्फत सेवाग्राम येथे आयोजित ॲन्यूअल ट्रेनिंग कॅम्प मध्ये फायरिंग, संचलन,कबड्डी, रनिंग, चित्रकला, रांगोळी,हस्ताक्षर, सांस्कृतिक स्पर्धा इत्यादी स्पर्धा आयोजिक करण्यात आल्या होत्या.या सगळ्या स्पर्धेमध्ये विद्यालयाच्या विद्यार्थांनी अतिशय सक्रिय सहभाग नोंदविला व पारितोषिके पटकावली. विद्यालयाच्या छात्रसैनिकांनी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये प्रदर्शित केलेल्या मिशन सिंदूर या देशभक्ती पर नाटिकेने द्वितीय क्रमांक प्राप्त करीत उपस्थितांच्या टाळ्या मिळविल्या.तसेच पार्थ क्षीरसागर या विद्यार्थ्याने १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक प्राप्त केला. कॅडेट उत्कर्ष नौकरकर या विद्यार्थ्याने डिबेट मध्ये अतिशय सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या बुद्धिमत्तेचा परिचय दिला. या शिबिरामध्ये 21 महाराष्ट्र बटालियन च्या 423 विद्यार्थांनी सहभाग नोंदविला. विद्यालयाचे एन सी सी ऑफिसर प्रा. प्रवीण शेळके यांनी कॅम्प मध्ये नेतृत्व गुण, पर्वतारोहन, विविध स्पर्धा परीक्षा इत्यादी विषयावर छत्रसैनिकांना मार्गदर्शन केले..या शिबिरामध्ये बटालियन चे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल जिसंतों,सुभेदार मेजर दिलबाग सिंग, पी आय स्टाफ तसेच इतर एन सी सी ऑफिसर चे मार्गदर्शन लाभले..
विद्यालयाच्या छात्रसैनिकांच्या या यशाबद्दल अध्यक्ष मनोज भेंडे,सचिव कृष्णा कडू,कमांडंट कर्नल के एच पाटील, प्राचार्य रविकिरण भोजने,पर्यवेक्षक नितीन कोठे शिक्षक v शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी छात्रसैनिकांचे अभिनंदन केले.